#ग्रा.पं. सदस्य युनियन संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या हस्ते उद्घाटन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
आंबोळी (ता खानापूर ) येथील श्री मायादेवी क्रिकेट क्लब यांच्या वतीने खास दीपावली निमित्त बुधवार दिनांक 22 रोजी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य युनियन संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, अर्जुन नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर शास्त्री, गिडाप्पा नाईक, पुंडलिक शास्त्री ,रमेश देसाई निलावडे ,मारुती पाटील, कॉन्ट्रॅक्टर शिवू आचारी,आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दि प्रजनन फोटो पूजन करण्यात आले.
यावेळी पहिल्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य युनियन संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या हस्ते पहिले सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिला सामना सण्णहोसुर विरुद्ध ढोकेगाळी यांच्यात लावण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक मुतगेकर यांनी मंडळ ला एक हजार रुपयाची देणग जाहीर केली.
यावेळी आंबोळी गावचे पंच कमिटी ,
नागरीक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


