संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नागुर्डा (ता. खानापुर ) येथे खास दीपावलीच्या सणांना आयोजित प्रतापगड किल्ल्याच्या देखाव्याचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयराम अशोक चापगावकर उपस्थित होते. किल्ल्याच्या देखाव्याचे उदघाटक म्हणून मारुती धारवाडकर हजार होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम खंन्नुकर, ज्ञानेश्वर पाटील ,गंगाराम चापगावकर,उदय महाजन, रामू महाजन ,दुर्गाप्पा महाजन, परशराम महाजन हणमंत महाजन, गणपती चापगावकर, कृष्णा महाजन, शिवाजी बुरुड, संभाजी चापगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतापगड किल्ल्याच्या देखाव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
प्रतापगडाच्या किल्ल्याचा देखावा पाहून गावच्या नागरिकांनी मुलांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू ठोंबरे यांनी केले. तर आभार आकाश चापगावकर यांनी मानले.


