#सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमध्ये व्याख्यान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बौद्धिक संपदा अधिकार हक्क हा केवळ एका देशाच्या सीमे पुरता मर्यादित नसून त्या त्याला जागतिक मान्यता देण्यात आली आहे. बौद्धिक चे संरक्षण करण्यासाठी जागतिक बौद्धिक संघटनेचे स्थापना झाली आहे.
अशी माहिती खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी शनिवार दिनांक 11 रोजी खानापूर सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयात आयोजित बौद्धिक संपदा या विषयावर बोलताना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एम जवळकर उपस्थित होते.
यावेळी अँड ईश्वर घाडी म्हणाले पेटंट वस्तू, पेटंट व्यापार चिन्ह, औद्योगिक संकल्प डिझाईन कॉपी कला सादरीकरण संगणकाची अज्ञावली अशा अनेक गोष्टी वर त्यांनी प्रकाश टाकला. शेवटी ते म्हणाले मानवाने आपल्या बुद्धीच्या व प्रयत्नाच्या जोरावर अनेक गोष्टीचा शोध लावला. यशोदा मुळे तयार होणाऱ्या वस्तू व सुख सोयी मुळे समाजाचे जीवन अधिकाधिक सुखमय झाले. मानवाने औद्योगिक उपकरणे तयार करताना तांत्रिक बाबींची वाढ केलेली आहे. त्यामुळे स्पर्धेची वाढ झाली आहे. त्यामुळे बौद्धिक संपदा व व वैचारिक कमालीची वाढ होत आहे.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर डी एम जवळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आय क्यू ए सी ची संचालक प्रा. अमरेश रेवतगाव, डॉ. सी बी.ताबोजी व इतर प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या जिरगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सी.बी. ताबोजी यांनी मानले.
