#खानापूर मराठा मंडळ हायस्कूल च्या एनसीसी छात्राकडून जागतिक नदी दिन साजरा!
#मलप्रभा नदी काठी एनसीसी छात्राकडून स्वच्छता मोहीम!
#एनसीसी छात्र व एनसीसी ऑफिसर पी. पी. काशीद यांचे मोलाचे कार्य!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बुधवार दि. 24 रोजी जागतिक नदी दिनाचे औचित्य साधून खानापूर येथील बेळगाव मराठा मंडळ संचालित मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूल च्या वतीने एन् सी सी छात्रा कडून जागतीक नदी दिन साजरा करण्यात आला .
प्रारंभी एन् सी सी छात्र व एन् सी सी ऑफिसर पी. पी. काशीद यानी शाळेपासून प्रभात फेरी काढली. त्यानंतर खानापूर शहरातील मलप्रभा नदी काठच्या मलप्रभा घाटावरील असलेला कचरा एकत्र करुन स्वच्छता केली. त्यामुळे मल प्रभा नदीच्या काठावरील परिसराला मोकळा स्वास दिला. आणि नदी काठ स्वच्छ केला.
मराठा मंडळ एनसीसी छात्र व एनसीसी ऑफिसर पी पी. काशीद यांच्या कार्याचे खानापूर शहरातील नागरिकांतून गोड कौतुक करण्यात येत आहे.
महाल्या सर्वपित्री अमावस्या निमित्त नदी घाटावर कचऱ्याचे साम्राज्य!
नुकताच महाल सर्वपित्री अमावस्या निमित्त खानापूर तालुक्यातील भाविकांनी मलप्रभा नदीच्या घाटावर प्लास्टिक पिशव्या, हार, पूजेचे साहित्य इकडे तिकडे टाकून दिले होते. त्यामुळे मलप्रभा नदीचा घाटावर कचऱ्याचे साम्राज पसरले होते. याची स्वच्छता मराठा मंडळ एनसीसी छात्र व एनसीसी ऑफिसर पी पी काशीद आदींनी स्वच्छता मोहिमेने सर्व परिसर स्वच्छ केला.
त्यांच्या या कार्याबद्दल
मराठा मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती राजश्रीताई नागराजू यांचे प्रोत्साहन लाभत असून तसेच संस्थेचे संचालक परशूरामअण्णा गुरव व शिवाजीराव पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.आणि शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही . कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
