संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर हे तालुक्याचे ठिकाण मात्र गेली कित्येक वर्षापासून खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूल साठी आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी प्रयत्न केले नाही.
खानापूर शहरात 80 टक्के मराठी भाषिक तर केवळ 20 टक्के कन्नड भाषिका आहेत असे असताना खानापूर शहरात मराठी सरकारी हायस्कूल उभारण्याकडे संबंधित शिक्षण खात्याचे याशिवाय आमदारांचे आजपर्यंत साफ दुर्लक्ष झाले आहे.
नुकताच इटगी (ता. खानापूर) सारख्या खेड्यात सरकारी हायस्कूल उभारण्यावरून वाद निर्माण झाला. आरोप प्रत्यारोप झाले. परंतु खानापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी एखादे सरकारी मराठी माध्यमचे हायस्कूल व्हावे. असे कोणत्याच आमदाराच्या लक्षात आले नाही काय?
एकंदरीत खानापूर शहरात 80 टक्के मतदान मराठी भाषीकातून होते. मग मराठी मतदारांच्या पाल्यांना सरकारी मराठी हाय स्कूल का होऊ नये. अशी मागणी खानापूर शहरातील मराठी भाषिक मतदारातून होत आहे.
सरकारी कन्नड माध्यमच्या हायस्कूलमध्ये मराठी हायस्कूलचा चा वर्ग सुरू करण्याची मागणी.
खानापूर शहरात गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी कन्नड माध्यम हायस्कूल सुरू आहे. मात्र याच इमारतीत सरकारी मराठी माध्यमाच्या हायस्कूलची सुरुवात करण्यास गेली कित्येक वर्ष प्रयत्न झाले नाहीत.
आज तागायत खानापूर तालुक्यात मराठी मातृभाषेचाच आमदार निवडून आला आहे. मात्र एकाही आमदाराला खानापूर शहरात मराठी माध्यमाच्या हायस्कूल व्हावे. ही इच्छाशक्तीच नव्हती. आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही नव्हते. त्यामुळे खानापूर शहरासह आजूबाजूच्या खेड्यातील मुलांना खाजगी संस्थेच्या मराठी हायस्कूलमध्ये ज्यादा पैसे खर्च करून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. सरकारी हायस्कूल मधून मिळणारा विविध योजनांचा लाभ मिळाला नाही. एससी एसटी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते त्याचाही लाभ मिळाला नाही. असे कित्येक विद्यार्थ्यांचे किती वर्षे नुकसान झाले आहे. निदान यापुढे तरी खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूलसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी आजी माजी आमदार आणि याकडे लक्ष देऊन सरकारी मराठी माध्यम हायस्कूलसाठी प्रयत्न करावे. अशी मागणी खानापूर शहरासह मराठी भाषेतून होत आहे.
