अँड. ईश्वर घाडी.
#आरएफओ शिवानंद निंगाणीचा सत्कार व सन २००४-०५ च्या.इ.१०वीच्या माजी विद्यार्थ्यीचा स्नेहमेळावा संपन्न.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
वनविभागाचे संरक्षण अधिकारी म्हणून निंगाणी घराणाच्या तीन पिढ्यानी सेवा बजावली.खानापूर तालुक्यात एसीएफ संभाजी निंगाणी यानी गेली अनेक वर्षे अरण्याची सेवा बजावली.खानापूर तालुक्याच्या नागरगाळी, लोंढा,कणकुंबी, खानापूर आदी भागात सेवा बजावुन आरएफओ पदानरून सेवा बजावली.आज ते एसीएफ पावर असताना त्यांचा सुपूत्र शिवानंद निंगाणी यानी ही वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवुन अरण्य विभागात आरएफओ पदावरून सेवा बजावत काही वर्षात मुख्यमंत्री सुवर्ण पदक मिळवून खानापूरचे भूषण वाढविले. खानापूरच्या मातीत लहानाचा मोठा होऊन आरएफओ पदावर जाऊन आपल्या सेवेत कर्तव्य दक्ष वनधिकारी म्हणून सेवा करताना २५० लाकूड चोरीच्या गुन्हाचा तपास लावून चोरट्याना शिक्षा ठोठावली. चित्त्याची, बिबट्याची शिकार करणार्या शिकार्याना २४ तासात पकडुन शिक्षेस पात्र करणार्या आरएफओ शिवानंद निंगाणी यांना मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्याहस्ते मुख्यमंत्री सुवर्ण पदक प्राप्त करून तालुक्याची मान उंचावली.त्या आरएफओचा सत्कार म्हणजे तालुक्याचा सत्कार.
अशा पुत्राला जन्म देणारे एसीएफ संभाजी निॆगाणी यानी खानापूर तालुक्यात राहुन केवळ वनरक्षक म्हणून सेवा बजावली नाहीतर गावोगावी प्रेमाचे नाते जपले.विविध कार्यक्रमात सडळ हाताने मदत करणे, लोकाच्या आडचणीॆत नेहमीच पुढे येऊन सहकार्य करने, त्यामुळे वन अधिकारी संभाजी निंगाणी हे खानापूरच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात घर करून आहेत.
एवढेच नव्हेतर सन २००४-०५ च्या मराठा मंडळ खानापूर च्या मा जी विद्यार्थ्यानी गुरूजनाचा सत्कार करून गुरू वंदनाचे आयोजन केले याचे कौतुक करावे तेवढेच कमी असे प्रतिपादन खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लाँक कांग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते.
व्यासपिठावर एसीएफ संभाजी निंगाणी, सौ.शोभा निंगाणी, सत्कार मुर्ती आरएफओ शिवानंद निंगाणी, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, समितीचे नेते विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील माजी जि प सदस्य जयराम देसाई,जोतिबा रोमाणी,
,माजी मुख्याध्यापक एस आर हत्ती,मुख्याध्यपक के.व्ही. कुलकर्णी,आय.बी.चिनगुडे, एस.एम.मुतगी, टी.आर.पत्री, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक माजी विद्यार्थी विजय शेट्टी यानी केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली.
या वेळी मुख्यमंत्री सुवर्ण पदक वि जे ते आऱएफओ शिवानंद निंगाणी यांचा सन २००४- ०५ सालच्याा मा जी विद्यार्थ्याच्यावतीनेे ,वकील संघटना, ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, म. ए.समिती, विविध संघ संघटना, वन खाते, मित्रमंडळी आदीच्या हस्तेशाल , पुष्प हार भेट वस्तु दे ऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी,टी आर पत्री,विलास बेळगावकर,मा जी आम दार दिगंबर पाटील, एसीएफ संभाजी निंगाणी , प्रमोद कोचेरी आदीची भाषणे झाली.
शेवटी सत्काराला उत्तर देताना सत्कारमु्र्ती आरएफओ शिवानंद निंगाणी म्हणाले की, खानापूर मराठा मंडळ हायस्कूलच्या शिक्षकानी मला घडविले, वडिलांच्या मार्गदर्शनाने आज मी आरएफओ पदापर्यत पोहचलो.खानापूर तालुक्याचे माझे मोठे ऋण आहेत.भविष्यात मी खानापूर तालुक्याच्या सेवेसाठी सदैव तयार आहे. असे मत व्यक्त केले.
सुत्रसंचालन व आभार पत्रकार वासुदेव चौगुले यानी मानले.
,

