#जांबोटी क्रॉसवर रस्ताजाम, वाहतूक ठप्प!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
राज्यात काँग्रेस सरकारने विकासात्मक कामासाठी अनुदान मंजूर करताना पक्ष भेदभाव केल्याने भाजपच्या आमदारांना रस्ते व विकास कामासाठी अनुदान मंजूर करताना दुर्लक्षित केले आहे. यासाठी भाजपचे राज्याध्यक्ष विजयेंद्र येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको करून सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे.
खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस वरील बसवेश्वर चौकात मानवी साखळी करून रास्ता रोको केला. यावेळी बराच वेळ वाहतूकीची कोंडी झाली.
प्रारंभी खानापूर तालुका भाजप सेक्रेटरी मल्लाप्पा मारिहाळ यांनी रास्ता रोको चा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रमोद कोजागिरी म्हणाले की, काँग्रेस सरकार विकासाच्या बाबतीत भेदभाव करत असून अनुदान मंजूर करत असताना भाजपच्या आमदारांना दुर्लक्षित करत आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जातीभेद करून वातावरण दूषित करत आहेत. असा आरोप केला. यावेळी एडवोकेट चेतन मनेरीकर, भाजप युवा नेते पंडित ओगले, एम.डी. सदानंद पाटील, मल्लाप्पा मारीहाळ, आधी नेत्यांनी काँग्रेसच्या कार्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था होण्यास काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
भाजपच्या वतीने रास्ता रोकोला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, बाबुराव देसाई, एडवोकेट चेतन मनेरकर, भाजपा युवा नेते पंडित ओगले, एम.डी . सदानंद पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, माझी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, बाबा देसाई, चांगाप्पा निलजकर, प्रकाश तिरवीर, सदानंद मासेकर, रवी पाटील, रवी बडीगेर, मोहन पाटील, संजय कांची आधी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
