#१५ हुन अधिक खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
तालुकास्तरीय 14 ते 17 वयोगटातील मुलांच्या गटात थ्रो बॉल प्रथम क्रमांक,
वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेत वेदांत होसुरकर यांनी 3000 मीटर धावणे,1500 मीटर धावणे व 800 मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला जनरल चॅम्पियनशिप देण्यात आली.
मुलींच्या गटात कुस्तीमध्ये भक्ती मनोहर गावडे, तनुजा रवींद्र गुरव व राधिका चाळगोंडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
तसेच शटल बॅडमिंटन मध्ये पार्थ पाटील, श्रेयस कोडचवाडकर, मुलीमध्ये श्रावणी कदम , संस्कृती गावडा, ज्ञानेश्वरी कुसाळे, यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. बुद्धिबळ स्पर्धेत शंकर खैवाडकर, मंथन लाड, सतीश सावंत, तर मुलीमध्ये श्रावणी कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
योगा स्पर्धेत वेदांत कोडचवाडकर समर्थ बासेटकर ,श्रेया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अडथळा स्पर्धेत. हरीश कुगजी, व 400 मीटर अडथळा स्पर्धेत आशिष हलगेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर 200 मीटर व 400 मीटर स्पर्धेत नागेश चौगुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
या विजयी खेळाडूंची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री सोमनाचे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती राजश्रीताई नागराजू तसेच संचालक परशराम गुरव , शिवाजीराव पाटील आणि मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी यांचे प्रोत्साहन लाभत आहे
