,#४०० खेळाडूंचा समावेश!
खानापूर प्रतिनिधी
खेळाडूंनी खेळात दूरदृष्टी कोण ठेवून खेळाकडे लक्ष द्यावे. केवळ मनोरंजन म्हणून खेळाकडे वळू नये. चांगल्या खेळाडूंना जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यामुळे खेळ खेळताना दूरदृष्टी कोण ठेवूनच खेळ खेळावे आणि संपादन करावे.
असे मत शरीरसौष्टव व भारत श्री सुनील आपटेकर यांनी खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद पदवी पूर्व कॉलेजच्या पटांगणावर
आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन वकील चेतन मनेरिकर उपस्थित होते. तर व्यासपीठावर सचिव सुहास कुलकर्णी, सदस्य जयंत तिनेईकर, सदानंद कपलेश्वरी, सुहास वर्दे, प्राचार्य एन के. ब जंत्री, प्राध्यापक श्रीधर हिरेमठ, प्राचार्य विनोद मराठे आधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. प्राचार्य पी. के . चापगांवकर यांनी केले.
क्रीडा शिक्षक रजत साळुंखे यांनी खेळाडूंना शपथविधी दिली.
यावेळी जिल्ह्यातील 400 खेळाडूनी सहभाग दर्शवला होता.
आभार प्राध्यापक एस एस पाटील यांनी मानले.
