हेस्कॉमचे दुर्लक्ष, गणपत गावडे
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील दुर्गा नगर वसाहतीत विद्युत खांब्यावर वेलींचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात मुले खेळत असतात चुकून मुलांनी वेलींना स्पर्श केला तर वीज प्रवाह चालू होऊन धोका पत्करण्याचा संभव आहे. तेंव्हा हा धोका टाळण्यासाठी संबंधित हेस्कॉम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबावरील वेलींचे जाळे काढून टाकून विद्युत खांबावरील कोणताही धक्का होऊ नये याची दक्षता घ्यावी. अशी मागणी दुर्गा नगर येथील माजी सैनिक गणपत गावडे यांनी केली आहे.
दुर्घटना होण्याआधीच याकडे संबंधित हेस्कॉम खात्याने लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.