संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सोमवार दि. १५ रोजी भेटी दरम्यान खानापूर येथील सरकारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधमात आलेल्या कारवार मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची भेट घेऊन आपल्या विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदन म्हटले आहे की, एफ आर एस प्रणाली सोडून द्यावी. अथवा सर्व कामे पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका केंद्रांना टॅब आणि वायफाय प्रणाली प्रधान करावी. कारण आपल्या भागात नेटवर्क नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार अंगणवाडी सेविका आहेत .आणि त्या ग्रॅज्युटी साठी पात्र आहेत. त्यांना वेतनश्रेणी महागाई भत्ता ग्रॅज्युटी पीएफ इएसआय सर्व सोयींचे फायदे करून द्यावेत. तसेच क व ड वर्गाला सहकार्य करावे. डी.ए.व चार्ज भत्ता वाढवावा. प्रोत्साहन धन सोडून देऊन कायमस्वरूपी व किमान वेतन दिले जावे. गेल्या दहा वर्षात मानधनात वाढ झालीच नाही . कमी मानधनात जगणे शक्य नाही. मानधन वाढवावे.नोकरीत कायम करावे. बहुतेक राज्यात निवृत्ती वय 65 आहे. तर काही राज्यात 60 ते 62 वर्षे आहे .तर ते 65 वर्षे समान रीतीने निश्चित करावे. आधी मागण्याचे निवेदन अंगणवाडी सेवक संघाच्या मेघा मिठारी यांच्या नेतृत्वाखाली खासदार विश्वेश्वर हेगडे कावेरी यांना देण्यात आले.
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अंगणवाडी सेविका संघाच्या भारती पै, सरिता पेडणेकर, अनिता पाटील , लता पाटील, शकीला परस यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
