“एक एकर जमिनीची व्यवस्था करण्याची केली सूचना”
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराचा वाढता विस्तार तसेच अनेक उपनगरे याचा विचार केला असता खानापूर शहराला चांगल्या प्रकारची स्मशान भूमी असणे गरजेचे आहे. तेव्हा एक एकर जमिनीची स्मशानभूमीसाठी सोय करावी. अशी सूचना कारवार मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी सोमवारी दि. 15 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्राम धमात घेतलेल्या भेटीच्या वेळी खानापूर तालुक्याचे दंडाधिकारी गुंडाप्पा कोमार यांना सूचना केली.
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून येत्या तीन महिन्यात स्मशानभूमीसाठी जागेची व्यवस्था करावी. व खानापूर स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा असे सुचित केले.
गेल्या कित्येक वर्षापासून खानापूर शहरासाठी सर्व सोयीने युक्त असे स्मशानभूमी मिळालेच नाही. सध्या शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता चांगल्या प्रकारचे स्मशानभूमी होणे गरजेचे आहे यासाठी तहसीलदार गुंडाप्पा कोमार यांनी जातीने लक्ष घालून स्मशानभूमी चा प्रश्न मार्गी लावा. असे सांगितले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या धनश्री सर देसाई, खानापूर रेल्वे कमिटी सदस्य राजेंद्र रायका, सुनील मासेकर, प्रकाश निलजकर, तसेच भाजप नेते , कार्यकर्ते मोठ्या व उपस्थित होते.
