” विकास कामांचा शुभारंभ, रेल्वे थांब्याला हिरवा कंदील”
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा निसर्गरम्य आहे. अशा तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून येत्या काही दिवसात खानापूर रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करून , टप्प्याटप्प्याने सर्व कामे मार्गी लागतील. वास्को पंढरपूर रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमनाथ यांनी सोमवार दि. 15 रोजी खानापूर रेल्वे स्थानकावरील विकास कामांचा लोकार्पण करताना दिली.
यावेळी १७३१६ हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस गाडीच्या थांब्याला हिरवा कंदील दाखविण्यात आला. यावेळी ते कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या मारुती मंदिर विकास कामाचा ही प्रस्ताव मांडण्यात आला.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमान ना, खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी , खासदार यांना कडाडी, आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, चिप ऑफिसर अजय शर्मा, श्रीमती बी . आर. मीना आदींच्या हस्ते ती प्रजनन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या सौ धनश्री सर देसाई, रेल्वे कमिटी सदस्य राजेंद्र रायका, प्रकाश निलजकर, गुंडू टोपिन कट्टी, सुनील नाईक, सुनील मासेकर व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- “कै पांडुरंग हेब्बाळकर शिक्षक ते विमा प्रतिनिधी “त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचा थोडक्यात परिचय:
- प्रथम स्मृतिदिन
- “कै पांडुरंग हेब्बाळकर शिक्षक ते विमा प्रतिनिधी ” त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचा थोडक्यात परिचय:
- प्रथम स्मृतिदिन
- “खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनच्या वतीने डाॅक्टर डे साजरा”
