“खानापुरात इंजिनिअर दिना निमित्त सर्टिफाय स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन”
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका इंजिनिअर असोसिएशन याच्या वतीने सोमवार दिनांक 15 रोजी खानापूर येथील जांबोटी क्रॉस जवळील सर्टिफाय स्कूल मध्ये इंजिनियर डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष आर आर कुलम होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व फोटो पूजनाने झाली. प्रारंभी खानापूर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. तर स्वागत सचिव संतोष नरसनावर यांनी केले.
यावेळी बोलताना खानापूर तालुका इंजिनिअर असोसिएशन अध्यक्ष आर आर कुलम म्हणाले की विद्यार्थ्यांनी बालवयेतच चांगले वळण लावून घेणे गरजेचे आहे. बाल वयेतच विद्यार्थ्यांनी शिस्त प्रामाणिक पणे अभ्यास केला तर भविष्यात यश नक्की मिळेल. विद्यार्थी जीवन हे आयुष्यात सर्वात महत्त्वाचे आहे. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांचा मार्ग चुकला तर तो आयुष्यामध्ये यशस्वी होणे मुश्किल आहे. तेव्हा प्रत्येकाने अभ्यास नियमित करावा. आणि यश संपादन करावे. असे योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाला इंजिनियर सिद्धलिंगया हिरेमठ, विष्णू गुरव, राजेंद्र गावडे ,राजू गुरव, सुनील गावडे, सुशांत गावडे ,चंद्रशेखर हट्टीकर, सचिन बेळगावकर, तसेच शाळेचे शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. इंजिनीयर राजेंद्र गावडे यांनी सूत्रसंचालन केले. तर विष्णू गुरव यांनी आभार मानले.




