#”ॳॅड. ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
कारवार मतदार संघाचे खासदार विश्वॆश्वर हेगडे कागेरी हे सोमवार दि.15 रोजी हुबळी दादर एक्सप्रेस गाडीच्या थांब्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यासाठी आले असता. खानापूर वकील संघटनेच्या वतीने वकील संघटनेचे अध्यक्ष वकील ईश्वर घडी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे. की खानापूर येथील कोर्टात खासदार फंडातून लॉयर चेंबर , प्रशस्त कॅन्टीन तसेच केंद्रीय कोट्यातून नोटरी जागा वाढवून द्याव्या आधी मागण्यां निवेदनाद्वारे सादर केल्या.
यावेळी खासदार विश्वॆश्वर हेगडे कागेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून, मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले.
निवेदन देताना वकील संघटनेचे अध्यक्ष वकील ईश्वर घऻडी, ज्येष्ठ वकील चेतन मनेरीकर तसेच आमदार विठ्ठल हलगेकर व इतर खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
