संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
उंचळी (ता. शिरशी) ग्रामपंचायत हद्दीतील केरेकोप गावा जवळील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याच्या कर्मचाऱ्याकडून सुखरूप पणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
रविवारी दिवसभर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली.
याबाबतची माहिती अशी की सुरेश हेगडे नामक स्थानिक शेतकऱ्याच्या कुटुंबाला विहिरीत पडलेला बिबट्या दिसून आला. ही घटना वनखाद्याच्या अधिकाऱ्यांना निर्देशनास आणून देण्यात आली.
रविवारी सायंकाळी पाच पर्यंत ही कारवाई करण्यात आली. तब्बल पाच तास प्रयत्न करून रात्री उशिरा बिबट्याला जिवंत विहिरीबाहेर काढण्यात यश आले. लागली बिबट्याला जंगलात सोडविण्यात आले.
तो बिबट्या पाच ते सहा वर्षाचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कारवाई दरम्यान कारवार जिल्हा वन अधिकारी संदीप सूर्यवंशी, एसीएफ एस.एस. निगाणी, भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल गिरीश नायक व डी डी आर एफ ओ ऐश्वर्या नायक इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
