#लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष,लायन रवीसागर उप्पीन यांच्या वाढदिवसा निमित्त!
#स्थळ : सरकारी हाॅस्पिटल खानापूर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅश्नल डिस्ट्रीक्ट ३१७ -बी ,लायन्स क्लब आँफ खानापूर व माजी अध्यक्ष लायन्स रवीसागर एस. उप्पीन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन उद्या मंगळवारी दि. ९ सप्टेंबर रोजी रक्त दान शिबीराचे आयोजन खानापूर येथील सरकारी हाॅस्पिटल मध्ये करण्यात आले आहे.
मंगळवारी दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते २ यावेळेत रक्तदान करा.आणि जीव वाचवा. यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करा. व रक्तदान शिबीर यशस्वि करावे.असे आवाहन लायन्स क्लब आँफ खानापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.