#आमदारांच्याहस्ते मानचिन्ह प्रमाणपत्र,शाल व पुष्पहार घालुन सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावचे सुपत्र व झाडनावगा येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. कुंभार यांचा
यंदाचा सन २०२५ -२६ सालाचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शनिवारी दि.७ रोजी खानापूर येथील शानया कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी आवरोळी मठाचे स्वामी चन्नबसू देवरू यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर ,बीईओ पी रामाप्पा,याच्याहस्ते
गर्लगुंजी गावचे शिक्षक पी.डी. कुंभार यांना मानचिन्ह,प्रमाणपत्र ,शाल व पुष्पहार घालुन यंदाचा तालुका आदर्श पुरस्कार देण्यात आला.
#झाडनावगे शाळेचे मुख्याध्यापक पी डी कुंभार यांचा परिचय!
पी डी कुंभार यांच्या शिक्षकी पेशेला प्रारंभ दि.११ आँगष्ट १९९४ साली सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा हब्बणहट्टी (ता.खानापूर ) या शाळेतुन झाली. याशाळेत दि .२ जुलै २००३ पर्यत ९ वर्षे सेवा केली. तेथून त्यांची बदली सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा झाडनावगे याशाळेत जुलै २००३ साली झाली. याशाळेत त्यानी गेली २२ वर्षे सेवा करत आहे.आज पर्यत त्यानी ३१ वर्षे शिक्षकी सेवा बजावली. त्याच्या दीर्घकाळ शिक्षकी सेवा व त्यानी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्याना यंदाचा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हब्बनहट्टी सारख्या जंगल भागात त्यानी ९ वर्षे प्रामाणिकपणाने सेवा बजावली आहे.
त्याचबरोबर गणेश मुर्ती तयार करण्याची आवड आहे .
मुख्याध्यापक पी डी कुंभार यांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे गर्लगुंजी गावासह खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.