#सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने!
#वेळ : सायंकाळी ७.४५ वाजता!
विषय:
- पर्यावरण पूरक गणेशोत्सव पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल.
- आजची तरूणाई व त्याना जडलेली व्यसणाधीनता.
- राजकरण ,निवडणूक आणि तरूणांच भविष्य.
- रील्स स्वैराचाराला आमंत्रण देतात का?
- स्त्रियांना हवे काय रक्षण की आरक्षण.
- लग्नासाठी जोडीदार निवडताना.
- सोशल मिडीया-संकट की संधी.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
करंबळ ( ता.खानापूर) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबद प्रमाणे यंदा ही खास गणेशोत्सवाचे औचित्य साधुन आज गुरूवारी दि.४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ .४५ वाजता भव्य खुली (ओपण ) भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना अनुक्रमे १० रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी इच्छूक स्पर्धकानी या स्पर्धेचा लाभ घ्यावा.असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करंबळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
