#नगरपंचायत नगरसेवक,आमदारांचे दुर्लक्ष गणेशाचे आगमन खड्डय्यातुनच!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षापासुन खड्ड्यांचे तसेच पावसाळ्यात पाण्याच्या डबक्यांचे साम्राज्य पसरले आहे.याकडे नगरपंचायतीचे व नगरसेवकांचे तसेच आमदारांचे लक्षच नाही आहे. सर्वजन डोळ्यावर पट्टी बांधुन आहेत.
त्यामुळे विद्यानगरातील नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यानगरात गणेशाचे आगमण खड्ड्यातुन करण्यात आले.
सध्या हिंदुचा पवित्र सन गणेशोत्सव मोठ्या उत्सहाने साजरा होत असताना, मात्र विद्यानगरात गणेशाचे आगमण खड्ड्यातुन तर पाण्याच्या डबक्यातुन करण्यात आले. त्यामुळे विद्यानगरातील रहिवाशातुन कमालीची नाराजी पसरली आहे.
याकडे खानापूर नगरपंचायतीचे चीफ आँफसर संतोष कुरबेट या भागाचे नगरसेवक नारायण मयेकर व आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कधीच याभागाचा दौरा केला नाही. की कधी समस्या जानुन घेतली नाही.
आमदारानी १० कोटीचा निधी पी के पी एस सोसायटीना मंजुर केला!
एकीकडे जिथ माणस राहतात.तेथे रस्ते नाहीत. त्या खानापूर शहरातील विद्यानगरात रस्त्यासाठी १० कोटीचा निधी मंजुर करावा. व जनतेची सोय करायचे सोडुन ,डी सी सी बॅकेची निवडणुक तोंडावर धरून गरज नसताना तालुक्यातील पी के पी एस सोसाट्याना १० कोटीचा निधी मंजुर केल्याचे सांगीतले जाते. तोच निधी नगरपंचायतीला दिला असता तर जनतेचा त्रास चुकला असता.
केवळ डीसीसी बॅकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून १० कोटीचा निधी मंजुर करण्यात रस घेतला.शहराच्या विकासासाठी कधी प्रयत्न होणार .या कडे शहरवासीयांचे लक्ष लागुन आहे.
तेव्हा विद्यानगरातील खड्डे ,पाण्याची डबकी बुजवुन सी सी रोड करावा. अशी मागणी याभागातील रहिवाशातुन होत आहे.
#प्रतिक्रिया:
विद्यानगरात रस्ता ,गटारी, पाणी ,दिवे. यासर्वच बाबतीत नगगरपंचायतीसह ,नगरसेवक,आमदार यांची कधीचे पाहणी झाली नाही.त्यामुळे येथील रहिवाशाना राहणे मुष्कील झाले आहे. याकडे लक्ष देऊन रस्ते, गटारी ,पाणी व दिव्यांची सोय करावी अशी प्रतिक्रीया सामाजीक कार्यकर्ते विनायक मुतगेकर यानी बोलुन दाखविली.
