#नागरीकानी सतर्क राहण्याचे ग्राम पंचायतीचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोंढा ( ता.खानापूर ) येथील पांढर्या नदीत मगर दिसल्याने लोंढा परिसरातील नागरीकांतुन भितीचे वातावरण पसरले आहे.
लोंढा गावच्या पंप गल्ली परिसरातील पांढर्या नदीत मगरीचे दर्शन झाले आहे. याच नदीत घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्तीचे विर्सजन केले जाते. विर्सजनावेळी कोणता ही धोका न घेता गणेशमुर्तीचे विर्सजन करण्याचे आवाहन ग्राम पंचायतीचे चेअरमन निळकंठ उसपकर यानी केले आहे.
तसेच वनखात्याच्या अधिकार्यानी पांढर्या नदीतील मगरीचा बंदोबस्त करावा.अशी मागणी केली.
