#तोपिनकट्टी एस डी एम सी कमिटीकडुन आयोजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणावर शाळा सुधारणा कमिटी व व्यवस्थापन समिती यांनी यजमानपद स्विकारून मंगळवारी दि.२ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या खो-खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष हुवापा गुरव उपस्थित राहणार आहेत. तर प.पूज्य रामदास महाराज यांच्या सानिध्यात होणार्या स्पर्धाचे उदघाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी दिपप्रज्वलन ग्राम पंचायत अध्यक्षा सौ .अनिता मुरगोड,बीईओ पी.रामाप्पा ,क्रिडा अधिकारी सुरेखा मिरजी, लैला शुर्गसचे एम डी सदानंद पाटील, आदीच्या हस्ते होणार आहे.तर विविध देवता चे फोटो पुजन एसडीएमसी उपाध्यक्ष व सर्व सदस्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वानी कार्यक्रमाला मोठ्या संख्याना उपस्थित राहण्याचे आवाहन एसडीएमसी कमिटीच्यावतीने करण्यातआले आहे.
