संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील यंदाच्या गणेशोत्सवाचे नियोजन शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आज मंगळवारी दि १९ रोजी दुपारी तीन वाजता खानापूर पोलिस स्थानकांच्यावतीने विशेष बैठकीचे आयोजन तालुका पंचायत कार्यालयाच्या सभा गृहात आयोजित करण्यात आली.
तेव्हा खानापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकार्यानी बैठकीला वेळेत हजर राहुन नियमांची माहिती व आवश्यक मार्गसुची माहिती घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी यांनी केले आहे.
या बैठकीत गणेश उत्सवाच्या काळातील कायदा व सुव्यवस्था , वाहतुक नियंत्रण ,ध्वनी प्रदूषण तसेच बैठकीत इतर आवश्यक विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.