#गुणी विद्यार्थ्याचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत ७९ वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे चेअरमन एफ.एम.पाटील होते. तर प्रमुख पाहुणे नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीचे चेअरमन आप्पया कोडोळी , सचीव डाॅ.डी.ई. नाडगौडा, ट्रेझरर डाॅ. पी.एन.पाटील,संचालक सातेरी पुन्नूचे ,प्रमोद चोपडे,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्थायी कमिटी चेअरमन आप्पया कोडोळी यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य बाळकृष्ण हलगेकर यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. तर स्कूलचे सचीव डाॅ. डी.ई.नाडगौडा यानी पाहुण्याचा परिचय करून दिला.
शाळेच्या गुणी विद्यार्थ्याचा पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रमुख पाहूणे आप्पया कोडोळी म्हणाले की, समर्थ इंग्रजी स्कूलच्या विद्यार्थ्याची गुणवंता प्रशंसा करण्या सारखी आहे. स्कूलचे वातावरण तसेच शिक्षक वर्ग उत्तम असल्याने शिक्षणा दर्जा ही चांगला आहे.तेव्हा खानापूर शहरातील नागरीकानी आपल्या मुलाना याचा लाभ करून द्यावा.असे आवाहन केले.
सचीव डाॅ.नाडगौडा यानी स्कूल प्रगती बद्दल शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनीषा कोदाळकर यानी केले.विद्यार्थीनी आदिती नाडगौडा यानी आभार मानले.
।