#खानापूर बसस्थानकावर शक्तीयोजनाचा आनंदोत्सव साजरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात काॅग्रेस सरकारने पाच गॅरेटी योजना सुरू करून दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला .
यात महिलाना मोफत बससेवेच्या योजनानाचा खानापूर बसस्थानकातुन ७७ लाख ९८ हजार ३८० महिलानी लाभ घेतला यानिमित्त खानापूर बसस्थानकात आंदोत्सव काॅग्रेसच्यावतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना गॅरेटी योजनाचे तालुका अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, कर्नाटक राज्यातील काॅग्रेस सरकर पाच गॅरेटी योजना यशस्वीपणे राबवत आहेत. त्यातील महिलासाठी मोफत बससेवा योजना खानापूर बसस्थानकातुन ७७ लाख ९८हजार ३६० महिलाना लाभ मिळाला आहे. त्यानिमित्त खानापूर बसस्थानकावर प्रवाशाना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसचे पुजन करण्यात आले.
यावेळी डेपो मॅनेजर यानी उपस्थिताचे स्वागत केले.
तर काॅग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत ,नगरसेवक लक्ष्मण मादार,सावित्री मादार, आदीनी सरकारच्या पाच गॅरेटी बद्दल माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाला तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी रमेश मेत्री, ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर ,गुडू टेकडी, नगरसेवक तोहिद चांदखन्नावर ,इसाक पठाण, महिला नेत्या व काॅग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.