केएसआरटीने लक्ष देणे गरजेचे!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील नुतन बसस्थानकाच्या प्रवेशव्दारा समोरच खड्डे पडले आहेत. बसस्थानकात प्रवेश करताना दुचाकी तसेच चारचाकी वाहनाना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.दुसरीकडे बसेस येजा करताना खड्ड्यातील पाणी प्रवाशाच्या अंगावर उडत आहे.याचा त्रास प्रवाशाना होत आहे. तेव्हा केएसआरटी च्या अधिकार्यानी याकडे लक्ष देऊन खड्डयांचा त्रास दुर करावा.
#केएसआरटीसीचे डेपो मॅनेजर खड्डयांकडे लक्ष देतील का?
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅस वरील नुतन बसस्थानकासमोर जागोजागी खड्डे पडले आहेत. याकडे केएसआरटीसीच्या डेपो मॅनेजरनी उघड्या डोळ्यानी लक्ष द्यावे. स्वखर्चाने जागोजागी पडलेले खड्डे बुजवावे. जेने करून बसस्थानकात येणार्या प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास कमी होईल.
तेव्हा या खड्डयांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी प्रवाशातुन होत आहे.
#पावसाचा जोर कायम!
खानापूर शहारसह तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले . तालुक्यातील नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. शिवारात पाणीच पाणी झाले आहे.
# गेल्या २४ तासात झालेल्या पावसाचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे.
- खानापूर १६ .४ मी मि.
- नागरगाळी १८.७ मी.मि.
- बिडी : ८.४ मी .मि.
- गुंजी ४६ .६ मी.मि
- लोंढा रेल्वे ४३ मी.मि.
- लोंढा पीडब्लूडी ४८.८ मी मि.
- कणकुंबी : १०२ मी मि. असुन तालुक्यात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कणकुंबी येथे १०२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.