#७ वर्षे सेवा बजावली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाचे सहाय्यक आकाॅऊट आँफिसर नमित इजारी यांची बेळगांव केपीटीसीएल कार्यालयात बदली झाल्या निमित्त खानापूरात निरोप समारंभ नुकताच पार पडला.
सहाय्यक आकाॅऊट आँफिसर म्हणून ४ जून २०१८ रोजी नियुक्ती झाली . गेली ७ वर्षे त्यानी खानापूर हेस्काॅम कार्यालयात प्रामाणिक पणे सेवा बजावली ,तालुक्यातील अनेक नागरीकांच्या समस्या त्यानी सोडविल्या आहेत.
यावेळी हेस्काॅम कार्यालयाच्यावतीने सहाय्यक आँकाऊट आँफिसर नमित इजारी याच्या बदलीनिमित्त शाल ,म्हैसुर फेटा,हार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंते जगदिश मोहित ,सहाय्यक अभियंते एस सी अंगडी,लक्ष्मी रंगनाथ,श्री देशपांड व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नमित इंजारी म्हणाले गेल्या सात वर्षात सेवा बजावताना तालुक्यातील नागरीकानी तसेच शेतकर्यानी व कार्यालयीन कर्मचार्यानी मोठे सहकार्य दिले. त्यामुळे सात वर्षाचा कालावधी कधी निघुन गेला .हे कळले सुध्दा नाही. असे मत व्यक्त केले.