#महिला उमेदवारी कुणासाठी ,पतीच्या बळावर, की महिलांच्या कामगीरीवर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात जिल्हा पंचायतीचे आरक्षण जाहिर झाले. आणि चक्क पाच जिल्हा पंचायतीवर महिलाचे आरक्षण जाहिर झाले.त्यामुळे महिलाना जिल्हा पंचायत उमेदवारीचे स्वप्ने पाडु लागली.
अशावेळी कोणत्या महिलाना उमेदवारी देणे हे पक्षाला अथवा संघटनेला आवाहन ठरते.यासाठी महिलानी कोणत्यातरी पदावर केलेली कामगीरी,पक्षासाठी अथवा संघटनेशी सतत केलेले कार्य याची नोंद करणे हेच महिला उमेदवारी निवडीसाठी योग्य आहे. नाही तर पती पक्षात मोठ्या पदावर कार्यरत आहे.अथवा आजी माजी प्रतिनिधी आहे. त्यांच्या पत्नीची निवड करणे हे कदापी योग्य नव्हे. केवळ पतीच्या जीवावर उमेदवारी मिळविणे, पूर्वी कधीच पक्षाच्या अथवा संघटनेचे नाव माहित नसलेल्या, पक्षात कधीच सहभाग नसले ल्या महिलाना उमेदवारी देऊन ज्या महिलानी पक्षासाठी, संघटनेसाठी सतत संघर्ष केला. विविध पदावर कार्य केले अशा महिलावर अन्याय होईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
जि.प.उमेदवार निवडताना महिलाच्या कामगीरीची चाचपणी करा!
खानापूर तालुक्यात चक्क पाच जिल्हा पंचायतीवर महिलाचे आरक्षण आले आहे.त्यामुळे महिलापेक्षा त्याचे पतीच जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उत्सुक झाले आहेत.यासाठी ज्या महिला स्वता पक्षात अथवा संघटनेत अनेक वर्षे कार्यरत आहे.पूर्वी कधीतरी एकादा पदावर कार्य केले.पक्षासाठी अथवा संघटनेसाठी घरदार सोडुन मोर्च्यात सहभागी झाले आहेत, अनेक वेळा प्रचारात सहभाग दर्शविला आहे.सामाजासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.सभेत, प्रचारात उभे राहुन भाषण केले आहेत. अशाच महिलाना उमेदवारी मिळणे गरजेचे आहे.
पती पक्षात पदावरकार्यरत आहे. अथवा प्रतिनिधी आहे.म्हणुन पत्नीला उमेदवारी देणे कितपत योग्य?
पक्षात अथवा संघटनेत एखाद्या पदावर कार्यरत आहे. किंवा प्रतिनिधी आहे म्हणून त्याच्या पत्नीला उमेदवारी योग्य नाही. त्यामुळे पक्षात अथवा संघटनेत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अथवा एखाद्या पदावर सेवा बजावलेल्या महिलाना त्याचा त्रास सहन करावा लागतो.ज्या महिला स्वत: पक्षात अथवा संघटनेत कार्य करणार्या महिला अशा महिलाना उमेदवारी देणे महत्वाचे आहे.त्यामुळे महिला पक्षात,संघटनेत विश्वासाने काम करत राहतील.
अन्यथा ज्या महिलाना पक्षाचे अथवा सॆघटनेचे तोंड बघितले नाही.केवळ पतीच्या जीवावर उमेदवारी देत असतील तर ज्या महिला पक्षासाठी, संघटनेसाठी काम करतात, अशा महिलावर एक अन्यायच होईल. हे नक्कीच!
आर्थिक परिस्थितीने कुमकुवत असणार्या पक्षाशी एकनिष्ठ असणार्या महिला उमेदवारांचा विचार करा !
अलिकडे निवडणुक लढविणे म्हणजे सर्वानाच जमणार नाही. यासाठी भरमसाठ पैसा पाहिजे, वरिष्ठांची मर्जी पाहिजे तरच निवडणुक लढविणे सुलभ होईल.असे प्रत्येक महिलाना सहज शक्य नाही.यासाठी ज्या महिला पक्षासाठी संघटनेसाठी सतत कार्यरत आहेत. अशाच महिलांचा पक्षाने,संघटनेने विचार करणे गरजेचे आहे.