# माजी ग्रा.पं. उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी घेतली डेपो मॅनेजरचीभेट!
संदेश क्रांती न्युज :
खानापूर प्रतिनिधी
आंबोळी (ता. खानापूर ) गावच्या बससेवा सुरळीत नसल्याने नुकताच दुसरा सुट्टी संपल्यानंतर शाळाना प्रारंभ झाला.शुक्रवारी सकाळी १० वाजता येणारी आंबोळी मुघवडे बसचा पत्ताच नसलेल्याने शाळेच्या विद्यार्थ्याना त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी बस न आल्याने पालकाना मुलाना दुचाकीवरून खानापूर व इतर ठिकाणी शाळाना पाठ वाले लागले.
ही बातमी समजताच निलावडे ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी लागलीच खानापूर डेपो मॅनेजर श्री संतोष यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना निलावडे ग्राम पंचायत माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की, निलावडे परिसरात दळनवळणाची सोय नाही. तेव्हा बस सेवा सुरळीत चालु नसली तर विद्यार्थी वर्गाचे भयंकर हाल होतात. कारण निलावडे परिसरातील खेडी जंगलभागात येतात, तेव्हा जंगली प्राण्यापासुन विद्यार्थ्याना धोका संभवतो.यासाठी जंगलभागातील बस सेवा सुरळीत चालु ठेवा.अशी सक्त ताकीद खानापूर डेपो मॅनेजर श्री संतोष याना दिली. लागलीच डेपो मॅनेजर श्री संतोष यानी कंडक्टर व ड्राव्हर सुचना करून निलावडे परिसरातील बससेवा सुरळीत चालु ठेवा.अशी सुचना केली.