#खानापूर कॉंग्रेसची ता.प., जि.प निवडणूक पूर्वतयारी बैठक संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात काॅग्रेस पक्षाचे बळ दाखवायचे असेल तर जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीत अधिका अधिक उमेदवार निवडुन आणून विजय मिळविणे हे एकच ध्येय कार्यकर्त्यानी उराशी बाळगावे . व निवडणुकीच्या तयारीला लागावे.असे विचार माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई निंबाळकर यानी मंगळवारी दि.१३ रोजी खानापूरातील रायगड निवासी खानापूर कॉंग्रेस ची निवडणूक तयारी संदर्भातल्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
यावेळी त्यानी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून देण्याच्या सुचना केल्या
बे़ळगाव जिल्हा कॉंग्रेस चे नुतन अध्यक्ष बसवराज सिग्गावी उपस्थित होते.
यावेळी ब्लॉक कॉंग्रेस तर्फे नवीन अध्यक्ष बसवराज सिग्गावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बैठकीत बर्याच कार्यकर्ता यानी व नेता यानी निवडणूक संदर्भात आपापले विचार मांडले. सुचना केल्या.
तालुका स्तरीय एक स्क्रीनिंग कमिटी नेमण्यात येणार असून येणारे सर्व अर्ज या कमिटी समोर ठेवून मग योग्य उमेदवाराची निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुकाभर सक्षम उमेद्वार देणार येतील,
तालुक्यातील काही जणांना पक्षामधे प्रवेश करायचा असून योग्य वेळी त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जाईल .
आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या संख्येने महिलांचे आरक्षण आले असून महिलांचा सहभाग राजकारणात वाढला पाहीजे असे मत व्यक्त केले. तसेच सावित्री मादार महिला अध्यक्षांनी सुद्धा महिलांच्या आरक्षणाबाबत आनंद व्यक्त केला .
बैठकीत ॲड .आय.आर.घाडी यानी खानापूर तालुक्यात काॅग्रेस पक्षाचे भविष्य आजमविण्याची ही वेेळ आहे.व्यक्तिगत राजकरण बाजूला ठेवून ज्याला उमेदवारी मिळेल, त्याला निवडूऩ आणण्याची जिद्द बाळगा, तरच तालुक्यात काॅग्रेसचे महत्व वाढेल, पक्ष बळकट होईल.असे मत प्रगट केले.
यावेळी महांतेश रात, लक्ष्मण मादार, , रियाझ पटेल, बेनी पिंटो , काशिम हट्टीहोळी, भैरू पाटील,व जिल्हा अध्यक्ष बसवराज सिग्गावी आ दी नी विचार मांडले.
उद्या काॅग्रेसचे आंदोलन
उद्या बुधवारी दि.१४ रोजी सकाळी निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमार विरूद्ध खानापूर कॉंग्रेस चे आंदोलन आंबेडकर पुतळ्यास हार घालून सुरू होणार आहे
तरी उद्या सकाळी सर्वांनी ९.३० वाजता आंबेडकर पुतळा खानापूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
