#वनजीवन सप्ताह साजरा”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कणकुंबी वलय अरण्य खात्याच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी दिपप्रज्वलन वलय अरण्य अधिकारी देवेंद्र माने व उपवलय अरण्य अधिकारी विनय गौडर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस जी चीगुळकर यांनी प्रास्ताविक भाषणात वन्यजीव सप्ताह साजरा करण्याविषयी वनखात्याची भूमिका तसेच विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी करावयाची जागृती याबद्दल माहिती देऊन उपस्थिताचे स्वागत केले. यावेळी बोलताना वलय अरण्य अधिकारी देवेंद्र माने म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत.आपण आपल्या भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक अडचणींचा सामना करण्यासाठी आतापासूनच जंगलाचे संरक्षण व वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. भारतीय संविधानामध्ये आपणा सर्वांना अशा प्रकारचा हक्क देण्यात आलेला आहे. जंगलाचे रक्षण करणे किंवा प्राण्यांचे रक्षण करणे ही जबाबदारी केवळ वनखात्याची नसून त्यासाठी युवकांनी व ग्रामस्थांनी देखील पुढं येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात किंवा जंगलमय भागात राहणाऱ्या नागरिकांना जंगलाविषयी किंवा वनसंपत्ती विषयी बरीच माहिती असते, परंतु वाढत्या अनैसर्गिक कृत्यामुळे यापुढे आपल्या भविष्यात येणारे संकट टाळण्यासाठी आत्तापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा अभियानाची गरज असल्याचे मानले यांनी सांगितले. याप्रसंगी कणकुंबी बीटगार्ड इराण्णा तळवार, चोर्ला बीट गार्ड फकीराप्पा नाईक तसेच वनरक्षक लिंगाप्पा घाडी, गोपाळ गावकर, गुरुदास नाईक, रामचंद्र पाटील उपस्थित होते.त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेऊन विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.आभार प्रदर्शन विजय गावडे यांनी केले.