संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक गुरुवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सीमाभागातील ऐतिहासिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने येत्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका संदर्भातील रणनीती ठरवणे, तसेच १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या ‘काळादिन’ आंदोलनाबाबत गांभीर्याने विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेणे या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
तालुक्यातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आणि सीमा चळवळीला गती देण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी स्वाभिमान टिकवण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकारिणी सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी, युवा समितीच्या सदस्यांनी तसेच सर्व मराठी संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे.असे आवाहन गोपाळराव देसाई (अध्यक्ष, खानापूर तालुका म. ए. समिती),
दिगंबरराव पाटील (माजी आमदार)
,मुरलीधर पाटील (कार्याध्यक्ष)
,निरंजन सरदेसाई (कार्याध्यक्ष)
,आबासाहेब दळवी (सरचिटणीस) आदीनी केले आहे.