#नवरात्र उत्सवानिमित्त दि.१२ ते १५ आँक्टोबर पर्यत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापुर ) येथील जय भवानी नव रात्रोत्सव युवा संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा ही होणार्या विशेष नवरात्र उत्सवानिमित्त भव्य खुल्या भजनी भारूड स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा सोमवारी दि.१२ ते गुरूवारी दि.१५ पर्यत होणार आहेत.
नाव नोंदणीची अंतिम तारीख शनिवारी दि.१० आँक्टोंबर आहे.तर प्रवेश फी १००१ रूपये आहे.
विजयी स्पर्धकाना आकर्षक बक्षिसे पुढील प्रमाणे: पहिले बक्षिस २१००१ रूपये,दुसरे बक्षिस १५००१ रूपये, तिसरे बक्षिस ७००१ रूपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
नाव नोंदणीसाठी संपर्क नंबर ९६३२७१४६१४. ,९९७२११३४७०, ९९०१४२६१५९, ९६११९५४९६२ आहे .
तरी इच्छुक भजनी भारूड मंडऴानी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन जय भवानी नवरात्रोत्सव युवा संघटनेने केले आहे .