#जिल्हाधिकार्याकडे तक्रार करणार विनायक मुतगेकर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी ( ता. खानापूर) ये थे शनिवारी दि.३ रोजी प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमाला खानापूरचे दंडाधिकारी, तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी दांडी मारली.त्यामुळे जांबोटी परिसरातील नागरीकानी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रम रद्द करा,जो पर्यत तहसीलदार येत नाहीत तो पर्यत प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रम होणार नाही.अशी भुमिका घेतली, य़ावेळी मात्र तालुक्याच्या आमदारानी नागरीकांची समजुत काढुन कार्यक्रम सुरू केला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार उपस्थित होते. तसेच पंच गॅरेटी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी,भाजप नोकिया सौ.धनश्री सरदेसाई, तर
व्यासपिठावर उपतहसीलदार एस के तंगोळी, कृषी अधिकारी डी बी चव्हाण,पशु अधिकारी मनोहर मामणी,प्रभारी बी ईओ मंजुनाथ हत्ती, सार्वजनिक बांधकाम खात्याचे संजय गस्ती, आर एफ ओ तेज वाय.पी,तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री , हेस्काॅम अभियंते प्रविण बरगाले,व इतर अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली.
यावेळी निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी जांबोटी भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील तसेच नेरसा ग्राम पंचायत हद्दीतील अनेक गावच्या शिवारातील उस,भात, केली, नारळ आदी पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.तेव्हा वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा.तुमची नुकसान भरपाई नको.तसेच कांजळे ते नेरसा तीन किलो मीटररस्ता,कांजळे आंबोळी ते बांदेकरवाडा हा रस्ता मेटलिंग करावा, निलावडे ते गवळीवाडा जोगमठ रस्ता मंजुर करा. जोगमठ येथे अंगणवाडी मंजुर करा .रस्ता करताना कोणत्याही प्रकारची आडचण आणल्यास खपवून घेणार नाही .यासाठी कणकुंबी आर एफ ओ याना चांगलेच धारेवर धरले.तहसील कार्यालयातुन शेतकर्याची अधिकार्याकडुन लुबाडणुक होत आहे.ती थांबवावी.अशी मागणी केली.
जांबोटी ग्राम पंचायतीचे सदस्य सुनील देसाई यानी मलप्रभानदीवरील कुसमळी येथील पाणी प्रकल्प बेळगाम ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाबाबत निवेदन सादर केले. व त्याबद्दल समस्या मांडल्या.
तर माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यानी खानापूर तालुका दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जाहिर करावा,व तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी केली.
यावेळी जांबोटी भागातील नागरीकांनी विविध समस्यांचा बडीमार केला.
यावेळी अधिकार्यानी समस्यावर उत्तरे देने कठीण झाले.
तहसीलदारांच्या अनुपस्थितीबद्दल नागरीकांतुन कमालीची नारा जी पसरली होती.
यावेळी खानापूर तालुक्याच्या आमदारानी लोकांच्या प्रश्नांचे निरसन करून उत्तरे दिली. व सोमवारी दि.५ रोजी खानापूर शहरात प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.पालक मंत्री येणार असल्याचे सांगुन आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन अध्यक्षीय भाषणात केले.