#पालक मंत्र्याची उपस्थिती!
#खानापूरातील लोकमान्य भवन सभागृहात होणार कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील लोकमान्य भवनात उद्या सोमवारी दि.५ रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूर तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या व मागण्या यावर चर्चा करण्यासाठी व लागलीच त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रजा सेवा आंदोलनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी असतील,तेव्हा तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन , आपल्या समस्या व मागण्या मांडाव्यात. असे आवाहन खानापूर तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.