# दि.२आँक्टोंबर रोजी संघटनेची स्थापना!
अध्यक्षपदी :सदानंद होसुरकर,
कार्याध्यक्षपदी : राजाराम गुरव,
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील शेतकर्याच्या हितासाठी, बैलगाडी शर्यतीचे शेतकर्याना प्रोहत्सान मिळावे.व शेतकर्याच्या आनंदासाठी खानापूर तालुका जय जवान जय किसान शर्यत संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.याला खानापूर तालुक्यातुन शेतकर्याचा मोठा पाठींबा मिळणार आहे.असे मत जय जवान जय किसान शर्यत संघटनेचे संस्थापक निवृत्त सुभेदार मेजर हणमंत गुरव यानी दि.२ आक्टोंबर रोजी संघटनेच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संदानंद होसुरकर होते.
प्रास्ताविक संचालक प्रकाश मजगावी यानी करून बोलताना ते म्हणाले कि ,खानापूर तालुका जय जवान जय किसान शर्यत संघनेच्या वतीने लवकरच दोड्डहोसुर येथील शर्यतीच्या मैदानावर बैल गा डी शर्यतीचे आयोजन करण्यात येणार ही शर्यत लहान गट व मोठा गट असे दोन गटात होणार आहे.व आकर्षक बक्षिसे ही देण्यात येणार आहेत अली माहिती दिली.
यावेळी अध्यक्ष सदानंद होसुरकर म्हणाले की, जय जवान जय किसान शर्यत संघटना स्थापून तालुक्यातील शेतकर्याना बैलगाडी शर्यतीचा आनंद देणार आहे.शेतकर्यानी शर्यतीचे बैलजोड्या जोपासुन तालुक्यात आपले नांव उज्वल करावे.हा आमचा ध्यास आहे.असे सांगीतले.
बैठकीचे औचित्य साधुन नव्या पदाधिकार्याची निवड!
खानापूरात नव्याने स्थापलेल्या जय जवान जय किसान शर्यत संघटनेच्या पदाधिकार्याची निवड करण्यात आली.
संस्थापक निवृत्त सुभेदार मेजर हणमंत गुरव,अध्यध सदानंद होसुरक ( माऴ अंकले), कार्याध्यक्ष राजाराम गुरव,उपाध्यक्ष नामदेव पाटील,सेक्रेटरी शांताराम कदम,उपसेक्रेटरी भाऊराव लक्ष्मण पाटील, खजिनदार गंगाराम मल्लापा बिरजे( गर्लगुंजी),उपखजिनदार जोतिबा खांबले,हिशोबतपासणीस कल्लापा पाटील, व मोहन निलजकर,यांची निव़ड करण्यात आली.
तर प्रस्तावक म्हणून शंकर पाटील,व प्रकाश मजगावी यांची निवड करण्यात आली.
तर संघटनेचे प्रमुख संचालक म्हणून लक्ष्मण चाळगुंडे,पांडुरंग हलगेकर,माजी जि.प.सदस्य लक्ष्मण बामणे, रूद्राप्पा हिंडोरी,वैजूबा वडगावकर,ज्ञानेश्वर पाटील यांची निव़ड करण्यात आली.तसेच संचालक पदी ३० जनांची निवड करण्यात आली.
आभार प्रकाश मजगावी यानी मानले.
