#बरगाव ग्रा.पं.माजी सदस्य,भाजप युवा नेते महांतेश पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बरगांव ( ता.खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीची कौले पडुन विद्यार्थी जखमी झाले.ही घटना घडल्याने शाळेच्या इमारतीबाबत आमदार विठ्ठल हलगेकर, व खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे बरगांव दौर्यावर आले असता, बरगाव ग्राम पंचायतीचे माजी सदस्य व भाजपचे युवा नेते महांतेश पाटील यानी सांगुन प्रत्यक्ष शाळेची पाहणी करून निधी मंजुर करून सहकार्य करावे.अशी मागणी केली असता खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यानी हे काम आमदारांचे आहे.,असे उत्तर दिले.तर आमदार विठ्ठल हलगेकर यानी सांगीतले असता हे काम ग्राम पंचायतीकडे येते असे सांगुन उडवा उडवीची उत्तरे दिले.अशी माहिती महांतेश पाटील शिवस्मारकात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि,मी भाजपा गेल्या २३त वर्षा पासुन तळमळीचा कार्यकर्ता आहे.भाजप पक्षासाठी सतत कार्यरत असुन ग्राम पंचायत सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केली आहे . या कालवधीत कोणाकडुन पैशाची मागणी केली नाही.जर कुणी आरोप केला तर निवडणुक लढविणार ऩाही.असे सांगीतले. केवळ आपली मराठी शाळा आहे, ती टिक ली पाहिजे, यातळमळीने मी आमदार खासदार याना शाळेची पाहणी करण्याची विनंती केली.मात्र याकडे त्यानी दुर्लक्ष केल्याने नाराजी होत आहे.
यावेळी आमदार खासदारांच्या कार्याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजप मधील जेष्ठ कार्यकर्त्याच्याकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष करत आहे.असा आरोप केला.
पक्षाचे आमदार खासदार म्हणून त्यादृष्टीने त्याच्याकडे कामाची अपेक्षा करत आहे. असे सांगीतले.
