#खानापूर तालुका भाजपच्या वतीने कार्यालयात सत्कार !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजप पक्षाच्या नेत्या व बेळगाव जिल्हा प्रधान कार्यदर्शी सौ.धनश्री करणसिंह सरदेसाई यांची कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा महासंघ बेंगळुरूच्या राज्य घटकाच्या प्रशासकीय मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या त्यांच्या निवडी बद्दल खानापूर तालुक्याचे व भाजपचे आमदारानी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तर पक्षसंघटना तसेच सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य घडो, व त्याच्या नेतृत्वाचा पक्षाला तसेच समाजाला चांगला लाभ व्हावा.अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष,तसेच सेक्रेटरी,गुंडू तोपिनकट्टी,भाजपचे प्रधान कार्यदर्शी मल्लापा मारीहाळ,अँड. चेतन मणेरीकर, मा जी नगर सेवक आपय्या कोडोळी,चांगाप्पा निलजकर, प्रवक्ते शंकर पाटील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
