#खानापूरात पत्रकार परिषद!
संदेश क्रांती न्यूज्य:
खानापूर प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षात भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यानी विकासच केला नाही.असे सांगणार्या काँग्रेसच्या माजी आमदार डाॅ.अंजलीताई. निंबाळकर यानी तालुक्याच्या विकासा
साठी राजकरण बाजुला ठेवून सहकार्य केले असते तर तालुक्याचे नंदनवन झाले असते.मात्र विकासाऐवजी अडथळेच निर्माण करण्याचे काम करत आल्याचा आरोप आमदार विठ्ठल हलगेकर यानी रविवारी दि.१३ रोजी भाजप कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलताना आमदार हलगेकर म्हणाले की,मी तीन वर्षात केलेल्या विकासाचा गाजाबाजा केला नाही. मी काम करत राहिले.
मात्र माजी आमदार डाॅ.अंजलीताई निंबाळकरनी पत्रकार परिषद घेऊन लोकाची दिशाभुल केली.असा आरोप आमदार विठ्ठल हलगेकर यानी केला.
गेल्या तीन वर्षा २५० कोटीची विकास कामे!
गेल्या तीन वर्षात २५० को टी ची कामे केली आहेत.
यामध्ये तालुक्यात १५० रस्त्याची कामे,४०० घरे मंजुर,तालुक्यात मंदिरासाठी १२ कोटीचा निधी मंजुर केला.८०० कामगाराना रोजगार उपलब्ध करून दिला.लक्ष्मी यात्रासाठी गावाना मोठा निधी उपलब्ध करून दिला. रस्त्यासाठी पीआयडी मधुन ७३ कोटी रूपये तर पीडब्ल्यूडी खात्यातुन १०० कोटी रूपये मंजुर तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन १६ कोटी रूपये मंजुर झाल्याचे सांगीतले.
असे सांगुन ते म्हणाले की मी स्वता शेतकर्यासाठी साखर कारखाना चालवतो. शिक्षणाची सोय केली.अनेक सोसायट्या काढुन ३०० जनाना नोकर्या
दिल्या.
असे असताना माजी आमदार डाॅ.अंजलीताई निंबळकर यानी तालुक्यातील एकाला तरी नोकरी दिली का? असा सवाल केला.
वाळु व्यवसायावर खरी आडचन मा जी आमदारानी केली. अधिकार्याच्या बदल्या करून स्वार्थ साधला.असा ही आरोप केला.
यावेळी क्षत्रिय मराठा परिषदेच्या राज्य उपाध्यक्षा सौ.धनश्री सरदेसाई,एम डी पाटील,मा जी नगरसेवक आप्पया कोडोळी,भाजप प्रवक्ता शंकर पाटील, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, अँड.चेतन मणेरीकर,पंडित ओगले.चांगाप्पा निलजकर आदी उपस्थित होते.
