#खानापूर चापगाव मार्गावर दैनंदिन बस सुविधा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील चापगाव गावाला यडोगा मार्गे चाप गाव, कारलगा, लालवाडी, चापगाव अशी बससेवेचा शुभारंभ मोठ्या उत्सहाने पार पडला.
यावेळी चापगाव गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खानापूर तालुका पंच गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्याहस्ते पुजन करण्यात आले.
तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते बसचे पुजन, श्रीफळ वाढविण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन बस चालक व बस वाहक तसेच खानापूर तालुका पंच गँरटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांचा शाल, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
चापगाव खानापूर बससेवा खानापूर आगारातुन दररोज सकाळी १०.३० सुटणार व यडोगा मार्गे चापगावला बस येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला पंच कमिटी अध्यक्ष नारायण मोदी.माजी ग्राम पंचायत सदस्य मारूती चोपडे, नागराज यळ्ळूरकर, नजीर सनदी,हनुमंत मादार, माजी सभापती सयाजी पाटील,महादेव दळवी, मष्णू चोपडे,राम कदम, रविंद्र पाटील, पिराजी मादार, कृष्णाजी पाटील,अर्जुन पाटील,लक्ष्मण पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आभार पत्रकार पिराजी कुराडे य़ानी मानले.
