#तालुका मलप्रभा क्रिडांगण समस्यांच्या विळख्यात, अनेक वर्षे दुर्लक्षित!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात प्राथमिक ,माध्यमिक शाळांच्या क्रिडास्पर्धाना प्रारंभ झाला आहे.केंद्र पातळीवर मोठ्या उत्साहात खेऴ खेळविले जात आहेत.गा वो गा वी खेळांडु खेळाचा सराव करत आहेत.त्यामुळे केंद्र पातळीवर त्यानंतर झोनल लेवल क्रिडा होणार आहेत.शेवटी तालुका पातळीवर क्रिडा स्पर्धा होणार आहेत.
मात्र खानापूर तालुक्यासाठी तयार असलेल्या मलप्रभा क्रिडांगणाकडे मात्र लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
“खानापूर शहरात एकमेव क्रिडांगण मलप्रभा क्रिडांगण”
,माजी आमदार कै.प्रल्हाद रोमानी यांच्या प्रयत्नातुन खानापूर शहरासाठी क्रिडांगणाची उभारणी झाली.लाखो रूपयाचा निधी मंजुर करून क्रिडांगणाची सुरूवात झाली.त्यानंतर मलप्रभा क्रिडागणाकडे कोणत्याच लोकप्रतिनिधी प्रगतीच्या दृष्टीकोणातुन पाहिलेच नाही.आज तागायत मलप्रभा क्रिडांगण जेसे आहे.तसेच आहे.त्यात कोणतीच प्रगती जाली नाही.
मलप्रभा क्रिडांगण अनेक समस्यांच्या विळख्यात !
खानापूर शहराच्या मोक्याच्या ठिकाणी जांबोटीक्राॅस जवळ असलेल्या मलप्रभा क्रिडांगणाला कोणतीच सोय नाही.
या क्रिडांगणावर कोणत्याच खेऴाची आखणी केली नाही. खेळाडुसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही.क्रिडागणावर दिव्याची सोय नाही. खेळांडुसाठी सौचायलय नाही, कि मुतारी नाही. एवढेच नव्हे तर क्रिडांगणाला संरक्षण भिंत सुध्दा नाही.याकडे कोणत्याच आमदारानी लक्ष दिले नाही.कि, निधी मंजुर करून सुसज्ज क्रिडांगण उभारावे असा विचार केला नाही.
त्यामुळे खेळांडुना उत्तम प्रकारे सराव करण्यासाठी सुसज्ज क्रिडांगण नसल्याने खेळाडु तयार होणे कठिन होत आहे. क्रिडास्पर्धाचे आयोजन करने क्रिडांगणा अभावी खूप त्रासाचे होत आहे.
मलप्रभा क्रिडांगण म्हणजे गायरान!
ज्या क्रिडांगणावर तालुक्याचे खेळाडु तयार व्हावे,अशी अशी आशा ठेवून क्रिडांगण उभारले तेच क्रिडांगण आज गायरान झाले आहे.मलप्रभा क्रिडांगणावर फुटभर रान वाढल्याने बेवार जनावरे, पाळीव जनावरे दिवसभर मलप्रभा क्रिडागणावर चरत असतात.मलप्रभा क्रिडांगण हे खेळाडुसाठी नसुन ते जनावराना चारण्यासाठी क्रिडांगण झाले आहे.
रात्रीच्यावेळी मद्दपीचे आड्डे!
मल प्रभा क्रिडांगण हे रात्र झाली सर्वत्र आंधार असतो.याचाच फायद्या घेत मद्दपी रात्रीच्यावेळी दारू पिऊन बाटल्या,प्लॅस्टीक ग्लास तसेच प्लॅस्टीक पिशव्या टाकुन जातात.
सकाळच्यावेळी फिरायला येणार्या नागरीकाना मात्र बाटल्याच्या काचाची पिता वाटते.पायाला काच लागण्याचा शक्यता असेत, क्रिडांगणावर प्लॅस्टीक,ग्लास, पिशव्याचा कचरा पडलेला असतो.
त्यामुळे मलप्रभा क्रिडांगणाचे खेळाचे पावित्र्य गमावुन बसलेले आहे.
तेव्हा तालु क्या च्या आमदारानी मलप्रभा क्रिडांगण सुसज्ज क्रिडांगण होण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी खेळांडुतुन होत आहे.
