विद्यार्थ्यानी स्पोकन इंग्लिश क्लासेसचा लाभ घ्यावा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेऴगांंव शहरातील एस. के. सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये स्वाध्याय विद्या मंदिर विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश क्लासेसची सुरुवात झाली. असून शनिवार दि.२२ रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी व्यासपीठावर स्वाध्याय विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका एच .आर कुलकर्णी, संचालक मंडळाच्या सदस्या धनश्री आजगांवकर, स्पोकन इंग्लिश क्लासेसचे संचालक कर्नल दिनकर पाटील, ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश भातकांडे, आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
प्रारंभी शिक्षक के एम गुरव यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर मुख्याध्यापक सुरेश भातकांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ अर्पण केला.
एस के ई सोसायटीच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्या धनश्री आजगांवकर यांनी मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यां मध्ये इंग्रजी भाषेचा न्यूनगंड राहू नये, यासाठी संचालक मंडळाच्या वतीने सदर स्पोकन इंग्लिश चे क्लासेस शाळेत सुरू करण्यात येत आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपल्या भावी जीवनात इंग्रजीमध्ये प्रभुत्व निर्माण करावं, असे आवाहन केले.
प्रमुख वक्ते कर्नल दिनकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना सोप्या रीतीने कसं इंग्रजी शिकता येईल, इंग्रजीचे उच्चार कसे योग्य करता येतील याविषयीची माहिती दिली.
मुख्याध्यापक सुरेश भातकांडे यांनी व्यवस्थापक मंडळाने निर्माण करून दिलेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असे सांगितले.
आभार प्रदर्शन स्वाध्याय विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका एच आर कुलकर्णी यांनी केले. व्ही. डी. करेगार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
