#जीव घेण खड्डे, लोक प्रतिनिधीनी प्रत्यक्ष पाहणी गरजेचे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील इदलहोंड गर्लगुंजी रस्त्यावरील रेल्वे ब्रिज पासुन गर्लगुंजी गावाच्या हद्दीपर्यत जागोजागी जीव घेणे खड्डे पडले आहेत.त्यामुळे यारस्त्यावरून ये जा करताना दुचाकी वाहन धारकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
याऱस्त्यावरून वीटवाहतुक मोठ्या प्रमाणात केली जाते.या आवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर जागोजागी दोन फुट खोल खड्डे पडले आहेत.ते ही पाण्याने भरून घेले आहेत.
त्यामुळे पाण्याने भरलेल्या खड्डयातुन दुचाकी स्वाराना येजा करताना तारेवरची कसरत करावी लागते.
गणेशचतुर्थीचा सन, खड्डयातुन प्रवास!
आवघ्या काही दिवसात हिंदूचा मोठा सन
गणेश चतुर्थी उत्सव येत आहे.या गणेशचतुर्थीच्या सनासाठी अनेक नोकर वर्ग, पाहुणे मोठ्या उत्साहाने येतात.मात्र इदलहोंड गर्लगुंजी रस्त्यावरून येताना सर्वानाच तारेवरची कसरत करावी.लागणार आहे.
तेव्हा खानापूर तालुक्याच्या आमदारानी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी.
अन्यथा गर्लगुंजी इदलहोंड परीसरातील नागरीकातुन कमालीची नाराजी पसरेल.अशी चर्चा यापरिसरातुन होत आहे.

