#अभिषेक, दर्शन, भजन ,आदी कार्यक्रम!
खानापूर प्रतिनिधी
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर तालुक्यातील शिवमंदिरात आज दुसर्या श्रावण सोमवार निमित्त सोमवारी दि
२४ रोजी भक्तानी मंदिरातुन गर्दी केली होती.
खानापूर तालुक्यासह खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाजवळील शिव मंदिरात दुसर्या सोमवारी भक्तानी शिवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंगेश्वर मंदिरात ही दुसर्या सोमवारी पहाटे अभिषेक
व आरती होऊन भक्तानी दर्शन घेतले.
सकाळ पासुन मंदिरात खानापूर शहरासह तालुक्यात भाविकानी मोठी गर्दी केली होती. यावेळी खानापूर विद्यानगरातील महिलानी, तसेच असोगा गावच्या महिलानी मोठ्या भक्तीभावने भजन केले.
यावेळी भक्ताना प्रसादाचे आयोजन केले होते.

