#२४आँगस्ट प्रारूप मतदार यादी प्रसिध्द!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
एस आय आर प्रक्रियेतर्गत खानापूर तालुक्यातील प्रारूप मतदार यादी आज सोमवारी दि.२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.या प्रक्रियेला तालुक्यातील जनतेने सहकार्याबद्दल मुख्य निवडणुक मतदार यादी नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण यानी समाधान व्यक्त केले.
प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर तपशीलाबाबत दावे,हरकती नोंदविण्यासाठी मुदत ही दि.२४ आँगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यत देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना अधिकारी बलराम चव्हाण म्हणाले की,एस आय आर प्रक्रियेत आतापर्यत झालेल्या मतदार नोंदणीची माहिती दिली आहे.,अंतिम मतदार यादी प्रसिद्द होईपर्य़त जनतेने असेच सहकार्य करावे.असे आवाहन केले.
यावेळी उपतहसीलदार एस के तंगोळी,व्ही.आर,मॅगेरी,सुनिल देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी खानापूर तालुक्यातील मतदारांची संख्या २लाख,१९हजार १५२ होती,तर एसआयआर प्रक्रियेनंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप यादीत १ लाख ,१हजार ८६६ पूरूष ,तर ९४ हजार ,८७९ महिला व ४ तृतीय पंथी, असे एकूण १ लाख,९६ हजार ७४९ मतदार नोंदविण्यात आले आहेत.
प्रारूप प्रक्रियेत एकूण २२हजार ४०३
मतदारांची तफवत आढळुन आली आहे.
या तफावतीमध्ये ५हजार ९०२ मृत मतदार, तर १२ हजार ७०८ कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार तसेच ३हजार ४९२ आधीच नोंद असलेले मतदार, तर ३०० अनुपस्थित मतदार आणि इतर कारणातील १ मतदार यांचा समावेश आहे.तालुक्यात एकूण ३१९ मतदान असल्याची माहितीही देण्यात आली.
दावे -हरकतीसाठी विविध नमुने!
एस आय आर प्रक्रियेदरम्यान निर्धारित कालावधीत इन्यूमेरशन फार्म सादर करता न आलेल्या पात्र मतदाराना विहित घोषणा पत्रासह नमुना ६ सादर करून मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्याची संधी देण्यात आली.
ऩमुना ६ : नवीन मतदार म्हणून नोंदणी.
नमुना ६ए: परदेशस्थ मतदार म्हणून नोंदणी
नमूना७:मतदारयादीतुन नाव वगळण्यासाठी
यमुना८: निवासस्थानात बदल,मतदार नोंदतील दुरूस्ती,इपीक बदल किला पीडब्ल्यूडी चिन्हांकनासाठी.हे नमूने इसीआय च्या मतदार सेवा पोर्टल वर उपलब्ध आहेत.

