#उद्या हेस्काॅम कार्यालयात विशेष केवायसी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या हेस्काॅम खात्याच्या गृहज्योती योजनेंतर्गत लाभार्थीची केवायसी प्रक्रिया येत्या ३१ आँगस्ट पर्यत अंतिम मुदत आहे.ज्या लाभार्थीनी अद्याप आधारकार्ड ,मतदान कार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड,व इतर कागदपत्रे सादर करून केवायसी केलेली नाही.त्यानी शनिवारी दि २२ रोजी खानापूर येथील हेस्काॅम खात्याच्या कार्यालयात उपस्थित राहुन केवायसी करून घ्यावी. असे आवाहन हेस्काॅम खात्याचे अभियंते प्रवीण बरगाले यानी केले आहे.
गृह ज्योति योजनेंंतर्गत केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ आँगस्ट असुन उर्वरीत नागरीकानी अंतिम मुदतीपूर्वी आपली केवायसी करून घ्यावी .
शनिवारी दि.२२ रोजी चौथा शनिवार सुट्टी असुनही नागरीकांच्या सोयीसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उद्याची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.तेव्हा ज्या लाभार्थीची केवायसी करायची आहे.त्यानी शनिवारी केवायसी करून घ्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे.

