संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्य़ा माजी आमदार व अखील भारतीय (एआयसीसी )सचिव डाॅ.अंजलीताई. हेमंत निंबाळकर यांचा आज शनिवारी वाढदिवस यानिमित्त त्याना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्या पंचहमी गॅरटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यानी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ए आय सी सी सचिव डाॅ.अंजलीताई हेमंत निंबाळकर यानी गेली अनेक वर्षे तालुक्याच्या विकासाच्या माध्यामातुन लोकांच्या मनात विश्वासाचे नाते जोडले आहे.आज सुध्दा लोकांच्या आडचणीच्या काळात धावुन जातात.त्यामुळे खानापूर तालुक्यासाठी त्या सर्वस्वी आहेत.
ऐवढेच नव्हेतर काॅग्रेस पक्ष संघटनेच्या माध्यमातुन आज त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ए आय सी सी कमिटीच्या सचिव म्हणून कार्य करतात. मात्र खानापूर तालुक्याच्या विकासासाठी त्यांचे बारीक लक्ष आहे.असे मत पंचहमी गॅरटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यानी प्रगट केले.
त्याच्या कार्या बोलताना ते म्हणाले की, तालुक्याच्या आरोग्यक्षेत्रात बालकासाठी अत्याधुनिक एम सी एच रूग्णालय ,व गर्भवती मगिला साठी रूग्णालय तसेच महाविद्यालये व शाळासाठी शेकडो वर्गखोल्यांची उभारणी ,सुसज्ज हायटेक बस स्थानक ,राज्यमार्ग, ग्रामीण भागातील रस्ते, नदी,नाल्यावरील पूल वजा बंधारे,वीज उपकेंद्रे व शेतीसाठी पाणी पुरवठा योजना आदी विकास कामे केली आहेत.
कर्नाटक राज्य सरकार ज्या पंचहमी गँरंटी योजनाचा लाभ खानापूर तालुक्यातील जनतेपर्यत पोहचविण्यासाठी त्यानी सतत मार्गदर्शन प्रोहोत्सन केले आहे.
त्याना हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक : श्री.सूर्यकांत कुलकर्णी, तालुका काँग्रेस पंचहमी गंँरंटी योजना अध्यक्ष खानापूर.