#माजी ग्रा.पं.,सदस्य महांतेश पाटील यांचे ता.पं.कार्यनिर्वाहक अधिकार्याना निवेदन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बरगांव (ता.खानापूर ) ग्राम पंचायतीचे पीडीओ हे १५आँगस्ट स्वतंत्र्यदिनी सकाळी
८वाजुन २० मिनिटानी हजेरी लावली,
सकाळी ७-४० ते ८-२० वाजेपर्यत वाजे पर्यत हजर नसल्याने उपस्थित प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,शिक्षक, पालक तसेच गावचे नागरिक व ग्राम पंचायत सदस्य आदीना पी डी ओ विलंब झाल्याने वाट पहात राहावे लागले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहन करण्यास खूपच उशीर झाला. शिवाय सर्वानाच पावसात थांबावे लागले, सर्वाना त्रास सहन करावा लागला. तेव्हा पीडीओच्या बेजाबदारपणामुळे ध्वजारोहन कार्यक्रमाला उशीर झाला.राष्ट्रीय कार्यक्रम सन्मानाला व शिस्तीला धोका पोहचला. अशा पीडीओच्यावर कारवाई करावी.
अशा मागणीचे निवेदन बरगांव ग्राम
पंचायतीचे माजी सदस्य यां च्या नेतृत्वाखाली बरगाव गावच्या नागरीकांच्यावतीने तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी याना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना बरगाव ग्राम पंचायतीचे माजी सदस्य महांतेश पाटील,गावचे नागरिक मंगेश पाटील,किरण पाटील,तानाजी पाटील ,मुझाहिद धामणेकर,मुरसुर धामणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
