संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मराठी बांधवांनो, जागृत व्हा! आपल्या हक्कासाठी बेळगावात एकत्र या!
कर्नाटक राज्यातील शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही!
कर्नाटक शासनातर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांसाठी जागा न ठेवता, मराठी भाषिक शिक्षकांना आणि शाळांना जाणीवपूर्वक डावलण्याचे धक्कादायक धोरण समोर येत आहे. हा आपल्या मातृभाषेवर आणि भावी पिढीच्या शिक्षणावर थेट हल्ला आहे. या अन्यायाविरुद्ध प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि मराठी माध्यमाच्या जागा त्वरित मंजूर कराव्यात या मागणीसाठी बेळगाव येथे _उद्या मंगळवारी दि.१८ रोजी डीडीपीआय कार्यालयावर धडक मोर्चा काढुन जाहीर निवेदन देण्यात येणार आहे.
आपल्या सीमाभागातील मराठीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि डी.एड., बी.एड. धारक तरुण-तरुणींच्या रोजगाराचा हक्क हिरावून घेणाऱ्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे.
- प्रमुख मागणी: कर्नाटक शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांसाठी न्याय्य जागांची त्वरित तरतूद करणे. असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्षगोपाळराव देसाई, दिगंबरराव पाटील माजी आमदार
,मुरलीधर पाटील,(कार्याध्यक्ष)
निरंजन सरदेसाई कार्याध्यक्ष)
,आबासाहेब दळवी (सरचिटणीस) आ दी नी केले आहे.