संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधि
खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी माध्यम शाळेत ८० स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष डॉ. एफ. एम. पाटील होते.
प्रारंभी अध्यक्ष डाँ.एफ एम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर संचालक डॉ एन एल कदम यांनी महात्मा गांधीजींच्या व डॉ डी ई नाडगौडा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार वासुदेव चौगुले, नागराज गडदार, नारायण चोपडे, सातेरी पुन्नुचे आदी उपस्थित होते. डॉ डी ई नाडगौडा यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करून वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवावे. देशसेवेचे कर्तव्य पार पडण्यासाठी सदैव तत्पर राहावे. व्यसनांपासून दूर राहून करिअरवर लक्ष द्यावे. असे आवाहन केले.
मुख्याध्यापक श्री हलगेकर यांनी स्वागत केले. प्रशासक सौ. दिव्या नाडगौडा यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
